माशांसाठी प्रसिद्ध असलेले `वाळणकुंड`

माशांसाठी प्रसिद्ध असलेले `वाळणकुंड`

कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात येणारे तिचे पाणी वाळण गावा अलिकडे सपाटीला लागते. खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुण्ड आहे .यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात. येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत. पावसाळी नदीचा प्रचंड प्रवाह माश्यांवर काहीही परिणाम करु शकत नाही. नदीवर येथे झूलतापूल बांधालेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला कि प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात. माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात. माश्यांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते. लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो
नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालाण्याची प्रथा आहे. वाहनचालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात. येथील मासे कोणीही कधीही मारत नाही.

valan kund

महाड़ पासून सुमारे 20 कि.मि.अंतरावर वाळणकुंड आहे. थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी अतिशय सुंदर फूलपाखरं पहावयास मिळतात. पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफूलांचे मळेच फुललेले असतात. येथे थेट वाहन जाते. चालण्याची अजिबात गरज नाही.
येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येतांना सर्व खाणे-पिणे सोबत आणावे..येथून जवळच रायगड, शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते. ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात येणारे तिचे पाणी वाळण गावा अलिकडे सपाटीला लागते. खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुण्ड आहे .यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात. येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत. पावसाळी नदीचा प्रचंड प्रवाह माश्यांवर काहीही परिणाम करु शकत नाही. नदीवर येथे झूलतापूल बांधालेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला कि प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात. माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात. माश्यांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते. लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो.
नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालाण्याची प्रथा आहे. वाहनचालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात. येथील मासे कोणीही कधीही मारत नाही.

valan kund

महाड़ पासून सुमारे 20 कि.मि.अंतरावर वाळणकुंड आहे. थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी अतिशय सुंदर फूलपाखरं पहावयास मिळतात. पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफूलांचे मळेच फुललेले असतात. येथे थेट वाहन जाते. चालण्याची अजिबात गरज नाही.
येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येतांना सर्व खाणे-पिणे सोबत आणावे..येथून जवळच रायगड, शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते. ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.
Marathi

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *