चवदार तळे (तलाव)
हे महाराष्ट्रातील रायगड यजिल्ह्यामधील प्रसिद्ध तालुका महाड येथे आहे याला पाहण्या साठी महाराष्ट्र व बाहेरून देखील पर्यटक येत असतात देशातील एक महत्वाचे पर्यटक तसेच ऐतिहासिक ठिकाण म्हणून चवदार तळे प्रसिद्ध आहे. अतिशय मनमोहक व इतके प्रसिद्ध असूनही एक वेगळीच शांतता रम्यता व भव्यता हे या तलावाचे वैशिष्टय आहे या तलावाच्या मध्य भागी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा पुतळा उभा आहे.

या तलावाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे तलाव समतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते देशात ज्यावेळेला अस्पृश्यता अस्तित्वात होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर या महामानवाने 1925 मध्ये येथे येऊन सत्याग्रह केला व अस्पृश्यतेच्या विरोधात आवाज उठवला