नांगलवाडी उद्यान हे महाड शहरातील एक सुंदर, स्वच्छ उद्यान आहे. हे उद्यान महाड एम. आय. डी. सी. कडून तयार करण्यात आलेला आहे. या उद्यानात अनेक प्रकारचे पक्षी आहेत.
उद्यानात विविध प्रकारची झाडं, फुलझाडं, वॉकिंग ट्रॅक आणि मुलांसाठी खेळण्याची जागा आहे. येथे येणाऱ्यांसाठी बसण्यासाठी जागा, सावली देणारी झाडं आणि शांत वातावरण असल्यामुळे हे ठिकाण निवांत वेळ घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी अनेक नागरिक येथे येतात.
3FX9+X4J, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) महाड, नदगाव तर्फ बिर्वाडी, नांगळवाडी, महाराष्ट्र ४०२३०९.