Mahad Guide
Stay & Food
वरंध घाट varandh ghat
पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर अ...
Published:
पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. महाडपासून २५ किलोमीटर, पूर्व पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. या ठिकाणापासून, दरीतील आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये दिसतात. कोंकणाच्या दिशेला ३००० फुटांच्या खोल दरीमुळे वस्त्यांसह अतिशय खडबडीत खोरी आहेत.Found information that has changed? Send a correction.