वीरेश्वर मंदिर महाड हे एक अतिशय पुरातन मंदिर असल्याची मान्यता आहे.
त्यानुसार हे मंदिर शिवकालीन असल्याचे मानले जाते या मंदिरविषयी येथील जनमानसात फार आदराची भावना आहे
हे मंदिर जागृत मंदिर असून वेगवेगळ्या आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहेत.
एका सुंदर तलावाकाठी हे मंदिर बनवलेले आहे महाड शहराच्या मध्य भागी हे मंदिर आहे नंदी सह अनेक देवगणांच्या मूर्ती येथे पाहावयास मिळतात.

दगडी बांधकाम अतिशय सुंदर व सुबक नक्षी काम व कलाकुसर पाहून मन मंत्रमुग्ध होते.
एका वेगळ्या शांततेचा व प्रसन्नतेच अनुभव या मंदिरात होतो
या मंदिरात रोज पूजा अर्चना पाहावयास मिळतात
शंकराच्या एका रुपाला विरेश्वर महाराज म्हणतात म्हणून शंकराचे अनेक भक्त इथे रोज श्रद्धेनं पाहावयास येतात

महाड मधील या मंदिरामध्ये शिवाजी महाराज व जिजामाता येत असत व तशा प्रकारचे पौराणिक दाखले सुद्धा मिळतात
महाशिवरात्री : दरवर्षी महाशिवरात्री (Mahashivratri) हा या मंदिराचा प्रमुख उत्सव असून एकादशीपासून सात दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान विरेश्वराची महापूजा बांधून नैवैद्य अर्पिला जातो.

बिजेचा छबिना : फाल्गुन शुद्ध द्वितीयेस श्री विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव साजरा होतो. रात्री गावातील सर्व देवांच्या पालख्या या ठिकाणी येतात. सर्व पालख्यांची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजतगाजत काढली जाते. हा कार्यक्रम रात्रभर सुरू असतो. सकाळी पालख्या विरेश्वराच्या मंदिरात परत आल्यावर लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची समाप्ती होते.
Jai Vireshwar Maharaj ki