mandale waterfall

मांडल्याचा धबधबा

महाड-रायगड रोपवेवर उजव्या हाताला लाडवली फाट्यावरून १२ किमी अंतरावर मांडले हे गाव आहे. गावाबाहेरून जाणारी नदी ओलांडली की, हाकेच्याच अंतरावर एक धबधबा आहे. धबधब्यावर जाण्यासाठी गावातूनच जावं लागते. गावकऱ्यांमध्ये हा धबधबा ‘मंडप’ या नावाने ओळखला जातो. मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या महानगरांपासून थोडं लांब असल्यामुळे या धबधब्याबद्दल लोकांना फारसं माहित नाही. पण गेली २-३ वर्षे इथे पावसाळ्यात धमाल करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

महाड - कोकणातील सुंदर शहर Raigad रायगड च्या कुशीतील महाड

आता तर ‘मांडले धबधबा’ हा पावसाळी वीकेंड पिकनिकसाठी मस्त स्पॉट ठरत आहे. सुमारे १०० ते १२० फुटांवरून कोसळणारा धबधबा प्रथमदर्शी घाबरवणारा वाटत असला तरी त्याच रूप मनाला भुरळ घालणारं आहे. या धबधब्याची खासियत म्हणजे स्वच्छ आणि सुरक्षित परिसर. या धबधब्याकडे जाताना भातशेतातून जावं लागते. कोकणातली भातशेती जवळून पाहण्याचा एक वेगळा अनुभव होऊ शकतो. शेतांतून जाताना भाताची हिरवीगार रोपं पाहिली की जमिनीवर जणू हिरवं पांघरूण घातल्याचाच भास होतो. दुर्गराज रायगडच्या भ्रमंतीसह मांडले धबधबा अनुभवण्याची एक अनोखी संधी पावसाळी पिकनिकच्या निमित्ताने चालून येते. इथल्या गावात राहण्याची सोय नाही. पण जेवणाची सोय मात्र होऊ शकते. गावातल्या धबधब्यानजिकच्या एखाद्या घरात जेवणाची ऑर्डर दिली असता जेवण तयार करून मिळू शकते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *