मंगळगड-कांगोरीगड पिंपळवाडी (महाड)

मंगळगड-कांगोरीगड पिंपळवाडी (महाड)

मंगळगड, ज्याला कांगोरीगड असेही म्हणतात, हा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील गावाजवळील एक ऐतिहासिक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला हा किल्ला साधारणतः 2295 फूट उंचीवर आहे आणि गिरिदुर्ग प्रकारात मोडतो.मंगळगड किल्ला चंद्रराव मोरे यांनी बांधला होता. इ.स. १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोहिमेदरम्यान हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नाव “मंगळगड” असे ठेवले. किल्ल्याचा वापर मुख्यतः कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात असे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडास वेढा पडला तेव्हा तेथील धन प्रथम मंगळगड येथे हलवण्यात आले होते. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीशांनी कर्नल पॉथर यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला ताब्यात घेतला .किल्ल्याची रचना व वैशिष्ट्ये कांगोरी देवीचे मंदिर: किल्ल्याच्या माचीवर कांगोरी देवीचे मंदिर आहे. या उंचीवर येऊन देवीचे दर्शन घेणे कष्टप्रद असल्याने, भक्तांनी खाली दुधाणेवाडीत या मूर्तीचे एक प्रतिरूप स्थापन केले आहे.तटबंदी व दरवाजे: किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष आजही पाहायला मिळतात. मुख्य दरवाजा आणि इतर बांधकामे सध्या उद्ध्वस्त अवस्थेत आहेत.पाण्याची टाकी: किल्ल्यावर दोन कातळकोरीव पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी एक कोरडी असून, दुसरीत पिण्याचे पाणी असते.नवरा-नवरी सुळके: किल्ल्याच्या पायथ्याशी दोन लहान सुळके आहेत, ज्यांना स्थानिक लोक “नवरा-नवरी” म्हणतात.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *