सावित्री नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या ५ नद्यां पैकी १ नदी सावित्री नदी आहे.
सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून तिचा प्रवास पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन तालुक्यानं मधून होऊन पुढे ती रायगडजिल्ह्यात बाणकोटच्या खाडीला अरबी समुद्रला मिळते.
नदी म्हणजे जीवन किंबहुना जीवनाचे उगम म्हणूनच आपण नदी कडे पाहतो. जेथून नदी प्रवाहित होते त्याच्या आजूबाजूने हिरवेगार डोंगर जीव जंतू मनुष्य वस्ती पक्षी असं वेगळंच चित्र पाहावयास मिळते तशीच आहे हि सावित्री माता महाड च्या आजूबाजूने वाहत जाते. सगळीकडे हिरवळ मनुष्य वस्ती आपण असे म्हणूयात ना कि जीवन वाढत जाते. अतिशय सुंदर व शांत व रुंद पात्र आहे, काही ठिकाणी बोटीची व्यवस्था सुद्धा आहे खुपसारे हॉटेल्स सुद्धा नदीला लागून आहेत. हि जीवनदायिनी आपल्याला नुसतं पाणीच नाही देत तर समृद्धी पण देते, आपल्या भावी पिढी साठी गर्द हिरवीगार झाडे देते.
इतकेच नाही तर आपल्या सगळ्यांनी केलेली अस्वच्छता , कचरा MIDC ची केमिकल्स आपल्या पोटात घेते व आपल्याला सुंदर व स्वछ परिसर देते.
पण कधी कधी या सर्व गोष्टींचा अतिरेक झाला कि शांत व संयमी असलेली आपली हि माता रुद्रावतार घेते व त्यामध्ये जे मिळेल ते सामावून घेते व म्हणूनच असं म्हटलं जात कि झाडे लावा , नदी स्वच्छ ठेवा कचरा नदीत नका टाकू , MIDC च्या केमिकल मुले आपण नदीत पोहूसुद्धा शकत नाही आज आपल्या कुटुंबाला पोहायचे असेल तर स्विमिंग पूल ज्यात साचलेले केमिकल युक्त व …. पाणी शोधावे लागते . एका कुटुंबाला ५०० ते १००० रुपये लागतात म्हणजे समुद्र जवळ आहे पण पाणी पितायेत नाही .
अशी अवस्था झाली आहे कृपया नदी स्वच्छ ठेवा नाहीतर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही