गांधारपाले लेणी

गांधारपाले लेणी

  गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. ह्या गुहा एनएच-17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत.…
केंबुर्ली धबधबा

केंबुर्ली धबधबा

केंबुर्ली धबधबा महाड शहराजवळ, महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात स्थित आहे. हा धबधबा निसर्गाच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे आणि इथे प्रचंड पर्यटक येतात. येथील शांत आणि हिरव्या वातावरणात पाणी ओसांडत जाणाऱ्या धबधब्याचे…
वाळणकोंड

वाळणकोंड

  कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात…
Regal College Mahad

Regal College Mahad

Regal College Of Technology Mahad Established in the year 2008 in Mahad, Raigad. Regal College of Technology, located in Mahad, Raigad district, Maharashtra, offers a variety of undergraduate programs in…
कोटेश्वरी माता || Koteshwari Mata

कोटेश्वरी माता || Koteshwari Mata

कोटेश्वरी मातेचं महाड येथील मंदिर हे पुरातन व स्वयंभू आहे कोटेश्वरी मंदिर हे कोटेश्वरी तळे महाड येथे असून हे खूप पुरातन आहे . दर वार्षि या ठिकाणी अक्षय तृतीयेला गोंधळ…
मुळचंद रामनारायण करवा वाचनालय karwa library mahad

मुळचंद रामनारायण करवा वाचनालय karwa library mahad

105 वर्षे वाचन परंपरेचा वारसा जपणारी महाडची मुळचंद रामनारायण शेट करवा लायब्ररी.  सन 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले व त्यानंतर काही दिवसांनीच ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळक यांची मंडालेहून सुटका…

चवदार तळे Chavdar tale (lake)

Cdgbxshn

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते.

तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.

 

शिवथरघळ

शिवथरघळ

दोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजेच घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदासस्वामींची शिवथर घळ. शिवथर घळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळं, पावसाळ्यात तिथं कोसळणाऱ्या धबधब्यामुळं पर्यटकांना आकर्षित करते.

रामदासस्वामी १६४९मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी १६६०पर्यंतचा काळ इथं व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणेः

शिवथरघळ पायर्या चढून आल्यावर समोरच ‘शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’ ने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळी मधे श्री समर्थांची मूर्ती आहे. याच घळीत समर्थांनी दासबोध लिहिला. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळणारा मोठा धबधबा पाहून खरच स्वप्नात असल्यासारखे भासते. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत.

कसे जाल?

शिवथरघळीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. पुढे १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी पोहोचतो. मुंबई- गोवा महामार्गावर महाडच्या पुढे एक नदीवरील पूल लागतो. त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोरकडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना बारस गाव आहे. येथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. येथून पुढे साधारण ३० किमी अंतर पार केल्यावर आपण शिवथरघळीच्या पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर ही गावे लागतात.

पुण्याहून भोर-वरंध-बिरवाडीमार्गे शिवथर घळ सुमारे १११ किलोमीटर.

– मुंबईहून गोवा महामार्गानं माणगाव-लोणेरे-महाड-बिरवाडीमार्गे २०५ किलोमीटर

सावित्री नदी

सावित्री नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या ५ नद्यां पैकी १ नदी सावित्री नदी आहे. सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून तिचा प्रवास पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन…