वरंध घाट varandh ghat
पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. महाडपासून २५ किलोमीटर, पूर्व पुण्यापासून ११०…










