कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी mahad
महाड तालुक्यात कोल हे गाव आहे या गावात प्राचीन बौद्ध लेणी आहेत इथे एकूण ७ लेणी आहेत. या गावात बौद्धवाडी च्या वरच्या डोंगरात ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे या लेण्यांचा इतिहास…
कोकणातील सुंदर शहर Raigad रायगड च्या कुशीतील महाड

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते.
तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.